छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे अवचित्त सादर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्यांचे वाटप

लोणावळा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अवचित्त सादर महाराष्ट्रीय ब्राह्मण संघ लोणावळा यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर या ठिकाणी विद्यार्थ्यांना बॅग, वही, पेन, पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.लोणावळा ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुधीर राईलकर, सचिव दत्तात्रय खिरे, सहसचिव जयवंत देशकर, खजिनदार रविंद्र कुलकर्णी, सदस्य चंद्रकांत जोशी, शशिकांत खंडेलवाल, मंगेश तेलंग आदी यावेळी उपस्थित होते.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सुभाष भानुसघरे यांनी सर्वांचे स्वागत केले, शाळेच्या सहशिक्षिका शितल मुळीक यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी बोलताना राईलकर यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम संघाच्या वतीने यापुढेही घेतले जातील असे सांगितले, तसेच विद्यार्थी वर्गाने अभ्यास करत असताना अवांतर वाचनही करावे असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय असे फक्त बोलून चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण देखील आत्मसात करणे गरजेचे असल्याचे राईलकर यांनी सांगितले.