Lonavala News l महाराष्ट्रातील प्रख्यात गायिका उत्तरा केळकर यांच्या हस्ते लोणावळा शहरातील 40 कलाकारांचा सन्मान
लोणावळा: महाराष्ट्रातील प्रख्यात गायिका उत्तरा केळकर यांच्या हस्ते लोणावळा शहरातील 40 गायक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. सुर साधना या संगीत परिवाराच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रख्यात गायिका उत्तरा केळकर ह्या लोणावळ्यात आल्या होत्या. त्यांच्या समक्ष या नवोदित गायकांनी गाणी सादर केली. नवोदित गायकांमध्ये बहुतांश गायक हे ज्येष्ठ नागरिक आहेत.
लोणावळ्यातील प्रसिद्ध निवेदक व सुर साधना संगीत परिवाराचे सर्वेसर्वा प्रदीप वाडेकर हे लोणावळा शहरातील ज्येष्ठ नागरिकांना गायनाचे धडे देतात. त्यांच्याच या गायन परिवाराचा तिसरा वर्धापन दिन ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे 16 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर संपर्क बालग्राम येथील मुलींनी प्रार्थना सादर करत या कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांनी आपल्या खास शैलीतील सत्यम शिवम सुंदरा, चला जेजुरीला जाऊ, बेलांची नागीन निघाली ही गाजलेली गाणी सादर केली. तसेच नवोदित गायकांनी आपल्या शैलीमध्ये उत्तरा केळकर यांच्या समक्ष गाणी सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
उपस्थित मान्यवर:
कार्यक्रमासाठी लोणावळ्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन ॲड. माधवराव भोंडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी नगरसेवक देविदास कडू, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पूजारी, संपर्क संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, आधार फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश पाठारे, बुवा मिसळचे अनिल गायकवाड, मावळ वार्ता संचालक संजय अडसूळे, लायन्स क्लबचे रिजन चेअरमन सुधीर कदम, भाजपा व्यापारी आघाडी लोणावळा अध्यक्ष अभय पारख, राष्ट्रवादी लोणावळा शरद पवार गट अध्यक्ष नासीर भाई शेख, शिवसेना उबाठा जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव निखिल कवीश्वर, माजी नगरसेविका अंजना कडू, शिवसेना लोणावळा शहर अध्यक्ष संजय भोईर, भाजपा लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे, लायन्स क्लब लिजेण्ड अध्यक्ष गोरख चौधरी तसेच सुनील पानगावकर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका वसुधा पाटील यांनी केले. तर उपस्थित सर्व मान्यवर व प्रेक्षकांचे आभार सुर साधना संचालक प्रदीप वाडेकर यांनी मानले.

