शिव वाहतूक सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन

लोणावळा : शिव वाहतूक सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी मंदिर दादर या ठिकाणी करण्यात आले. यावेळी शिव वाहतूक सेनेच्या वतीने दशावतारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख व शिव वाहतूक सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य महेश भाऊ केदारी, शिव वाहतूक सेना अध्यक्ष महेश पोरे, उपाध्यक्ष संजय चावनेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख शिवाजी झोरे, नवी मुंबई उपाध्यक्ष इकबाल भाई शेख, संदीप देशमुख, राजेंद्र भिसे, चंद्रकांत टीकम, महेंद्र जाधव, प्रवीण ढवळे, किरण हेडाऊ, सचिन साठे, विनायक बेलोस्कर, संजय दळवी, दीपक जाधव, प्रवीण पालकर पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.