संपर्क संस्था व रुचिका क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत वैद्यकीय शिबिराचा 1700 रुग्णांनी घेतला लाभ

लोणावळा : संपर्क संस्था मळवली येथील शिबिरात डोळे, कान, नाक, घसा तसेच स्त्री रोग तपासणी व ब्रेस्ट कॅन्सर तपासण्या करण्यात आल्या. या दोन दिवसीय वैद्यकीय शिबिराच्या उदघाटना प्रसंगी रुचिका क्लब च्या संस्थापिका सुमित्रा श्रॉफ, संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, रुचिका क्लब च्या व संपर्क च्या विश्वस्त किरण आर्या, सदस्य अलका संघाय, ज्योती जालान, अनुपमा जालान, भाजे गावचे सरपंच अमित ओहाल, कार्ला सरकारी दवाखान्याचे अधिकारी डॉ वाघमारे, किशोर खडसे, डॉ अश्विनी पवार, डॉ गणेश शिंदे, डॉ गिरी तसेच संपर्क चे अनुज सिंग वइतर वैद्यकीय टीम तसेंच संपर्क चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या शिबिरात 788 रुगांची डोळ्याची तपासणी करण्यात आली. 574 मोफत चष्मे वाटप करण्यात आले व औषध्ये देण्यात आली. कान, नाक, घसा 410 रुग्णाची तपासणी करून त्यांना मोफत मशीन देण्यात आल्या तर 245 तरुणांची थालासेमिया रक्त चाचणी करण्यात आली. बेस्ट कॅन्सरची 41 महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच इतर 205 महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रुग्णांना भेट स्वरूपात रुचिका क्लब च्या वतीने ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.हे शिबीर यशस्वी केल्याबद्दल अमितकुमार बॅनर्जी यांनी सर्व संपर्क च्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. अमितकुमार बॅनर्जी यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले, सूत्रसंचालन प्रदीप वाडेकर यांनी केले.