लोणावळा नगर परिषदेत महिलांसाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण विभाग आणि मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.या समारंभात व्यवसाय कौशल्य शिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे व उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.यावेळी बोलताना मुख्याधिकारी अशोक साबळे म्हणाले, महिलांनी स्वतः मधील सुप्त गुणांना वाव देत अधिक सक्षम व्हावे. याकरिता महिलांनी व्यवसाय कौशल्य शिकून स्वावलंबी होणं महत्त्वाचं आहे. यामधून महिलांचा आर्थिक व सामाजिक स्तर देखील उंचावणार आहे. याप्रसंगी मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेश्मा शेख यांनी संस्थेच्या महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंना लोणावळा परिषद तर्फे चांगला प्लॅटफॉर्म देण्याची विनंती केली. हा समारंभ महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरला आहे.