Lonavala News l छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सुरू असलेले चुकीचे प्रकार तत्काळ रोखण्यासाठी उपाययोजना करा… अन्यथा आंदोलन करण्याचा हिंदू राष्ट्र सेनेचा इशारा…
लोणावळा : लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी महाविद्यालयीन युवक युवती तसेच तरुण पर्यटक चुकीचे प्रकार घडत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे याबाबत यापूर्वी देखील लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला व लोणावळा शहर पोलिसांना याबाबत निवेदन देत तात्काळ हे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा किंवा स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.याविषयी बोलताना हिंदू राष्ट्र समितीचे पदाधिकारी म्हणाले महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सदरचे उद्यान विकसित करण्यात आले आहे मात्र त्या ठिकाणी मागील काही काळापासून तरुण-तरुणी महाविद्यालयीन युवक युवती यांच्या माध्यमातून चुकीचे व अश्लाघ्य असे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत तसेच दिवस रात्र या दोन्ही पाळ्यांमध्ये या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावेत. पोलीस प्रशासनाने देखील या उद्यानामध्ये दिवसा व रात्री गस्त घालावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या ठिकाणाचे पावित्र्य राखण्याचे काम लोणावळा नगरपरिषद प्रशासन व लोणावळा शहर पोलीस या दोघांनी करावे अशी मागणी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.