Expressway Accident News l मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरचा अपघात; एकाचा मृत्यू
मावळ माझा न्युज नेटवर्क : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Way Accident) आज पहाटेच्या सुमारास किमी 43/100 याठिकाणी एका कंटेनरचा अपघात झाला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारली व मात्र दुर्दैवाने यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरच्या (NL 01 AB 8096) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर दुभाजकावर चढला यावेळी जीव वाचवण्यासाठी चालकाने गाडीतून बाहेर उडी मारले मात्र या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी कंपनी व देवदूत पथक घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली होती. सदरचा कंटेनर दुभाजकावरून पुणे लेनवर आल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी एक मार्गिका काही काळ बाधित झाली होती.