महिलांच्या जीवनातील संघर्षाला विराम देत त्यांच्या स्वप्नांना बळकटी देणारे महिला नेतृत्व म्हणजेच ज्योती दीपक मालपोटे
लोणावळा : महिलांच्या जीवनातील संघर्षाला विराम देत त्यांच्या स्वप्नांना बळकटी देणारे महिला नेतृत्व म्हणजेच ज्योती दीपक मालपोटे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून महिलांना व नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने आमदार सुनील शेळके व सारिका ताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ज्योतीताई मालपोटे ह्या लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.
सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्या घरातील महिला ही स्वावलंबी व सबल होणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून ज्योतीताई मालपोटे ह्या मागील अनेक वर्षापासून महिलांच्या आयुष्यातील संघर्षाला विराम देत त्यांना स्वावलंबी बनवत त्यांच्या स्वप्नांना बळकटी देण्याचे काम करत आहेत. आमदार सुनील शेळके युवा मंचचे प्रमुख कार्यकर्ते व आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू असलेले दीपक मालपोटे हे या कामांमध्ये ज्योतीताई यांना दिशा दाखवण्याचे काम करत असतात. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मानत मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे काम ज्योतीताई यांनी केली आहे. महिलांना शिवण क्लास, कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण, महिलांच्या कलागुणांना वाव देत त्यांना व्यवसायाभिमुख बनवत त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी त्यांची निवड झाल्यानंतर लोणावळा शहर व परिसरातील हजारो नागरिकांना त्यांनी या योजनेच्या अंतर्गत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी केली आहेत. शासनाने ज्या घटकांसाठी या योजना बनवल्या आहेत त्या घटकांपर्यंत त्या प्रभावीपणे पोहोचवल्या तर निश्चितच त्याच्याही जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडू शकतो याकरिता कोणतेही गोष्टीची तमा न बाळगता अहोरात्र या गरजू गरजवंत व सर्वसामान्यांसाठी त्या सतत कार्यरत आहेत.
लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता राखीव झाले आहे. या पदासाठी ज्योतीताई यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांना मधील सर्वाधिक प्रभावशाली शहरा म्हणून आज ज्योतीताई मालपोटे यांच्याकडे लोणावळा शहर पाहत आहे. त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य हीच त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी पद असणे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी सदरची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार सुनील आण्णा शेळके व सारिका ताई शेळके यांच्या पाठिंब्याने त्या निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. एका युवा व कर्तुत्ववान महिलेला लोणावळा नगर परिषदेचे नेतृत्व करण्याचे संधी मिळाल्यास नक्कीच त्या संधीचे सोने करत लोणावळा शहरांमधील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करून दाखवण्याची धमक ज्योतीताई यांच्या नेतृत्वामध्ये आहे. पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून लोणावळा शहराकडे पाडले जाते भविष्य काळामध्ये या ठिकाणी पर्यटनात्मक मोठा बदल होणार आहे हे होत असताना लोणावळा शहरातील महिला युवक यांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा व लोणावळा शहरातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सक्षम बनवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

