Lonavala News l लोणावळ्यातील मॅगी पॉईंट येथे शनिवारी रात्री तरुणावर जीवघेणा हल्ला; तीन जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा येथील मॅगी पॉईंट जवळ शनिवारी (18 जानेवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जखमी तरुणांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रुपेश श्रीराम शेलोकर (वय 32, रा. तुगांर्ली, लोणावळा) या जखमी तरुणांने दिलेल्या फिर्यादीवरून अजय गणेश नायडु, विजय गणेश नायडु व विजय नायडुची पत्नी नाव माहीत नाही (सर्व रा. हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश शेलोकोर हे मॅगी पॉईंट येथील आकाश येवले यांच्या मॅगी पाँइटच्या स्टॉलवर मँगी खात असताना अजय नायडु हे स्टॉल मालक आकाश येवले याचेबरोबर वाद घालत होते. तेव्हा रुपेश याने अजय नायडु यास भांडने करु नकोस तुला काय खायचे ते खा असे म्हणाला असता त्याचा राग येवून अजय नायडु याने त्याचा भाऊ विजय नायडु व त्याची पत्नी नाव माहीती नाही यांना बोलावून घेवून रुपेशच्या डोक्यात चाकूने वार केले तसेच हातातील काठीने मारहाण करत जखमी केले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर केरूळकर हे करत आहेत.