मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम

लोणावळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि गटनेते देविदास कडू मित्र परिवार यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात शहरातील असंख्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. पालक व नागरिकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे चेहेरे आनंदाने उजळून निघाले.

“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हीच खरी गुंतवणूक आहे,” असे मत गटनेते देविदास कडू यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले, “संस्कारक्षम आणि शिक्षित पिढीच देशाचे भविष्य घडवते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांसाठी दीर्घकालीन योजना राबवण्यात येतील.”

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात समाजहिताची जाण ठेवत वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा आदर्श पाहायला मिळाला.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष सोनवणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी, दादा धुमाळ, राजेंद्र चौहान, अरुण लाड, गटनेते देवदास कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष विलास बडेकर, लोणावळा शहर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भोईर, ज्येष्ठ नेते अरविंद मेहता, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, अर्पणा बुटाला, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, भाजपा नेत्या अश्विनी जगदाळे, सुषमा कडू, अश्विनी लाड, दिपाली कांबळे, भरत भरणे, राजू परदेशी, युवक अध्यक्ष प्रथमेश पाळेकर, शशिकांत मानकर, बाबू संपत, अरुण काका जोशी, सरपंच सिद्धार्थ कडू, श्रवण चिकणे, उद्योजक गिरीष पारेख, संतोष चोरडिया, सुनील कचरे, शैलेश कचरे, अविनाश पवार, विशाल पाठारे, जयप्रकाश परदेशी, आयुष कांकरिया, सिद्धार्थ आंबोरे, शुभम मानकामे, अमित चोरडिया, दीपक कांबळे, ऋतिक हरिश्चंद्रे, स्वप्नील सावंत, शैलेश ठाकर, अनिल बांदल, श्री. वास्कर, प्रकाश कालेकर, सचिन साठे, अविनाश शिंदे, बालकृष्ण चिकणे, पोपट शिंदे, विजय मानकर, योगेश दळवी, मारुती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *