लोणावळा वलवण येथे जुगार अडडयावर पोलीसांचा छापा; 12 जणांसह 6 लाखांची रोकड व मुद्देमाल हस्तगत

लोणावळा : वलवण येथे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली लोणावळा शहर पोलिसांनी नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये 12 जणांसह सुमारे पाच लाख 89 हजार 30 रुपयांची रोकड व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस फौजदार शकील शेख पोलीस नाईक हनुमंत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश जाधव यांनी 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.10 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एका टपरी शेजारी सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर हा छापा टाकला.

यामध्ये गुरुदेव सिंग किसन सिंग, विठठल बंडगर, मोहन मंजुळे, दिलीप शिंदे, संदीप ठोंबरे, विशाल पाळेकर, सुनिल खांडेभरड, संतोष येवले, तुकाराम येवले, किसन मेणे, सिताराम खांडेभरड, विनोद धारे यांना तीन पत्ती जुगार खेळताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व इतर साहित्य असा 5 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

      या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार शकील शेख हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *