चेहरा नवा देवा भाऊच हवा ! लोणावळा नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असलेल्या देविदास कडू यांच्या गणपती गाव भेट दौरा व दर्शन दौऱ्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

लोणावळा : लोणावळा शहरातील नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असलेल्या देविदास कडू यांनी गणेश उत्सवाच्या निमित्त लोणावळा शहरांमधील प्रत्येक प्रभागांमध्ये गावभेट व गणपती बाप्पा दर्शन दौरा सुरू करत मागील दहा दिवसांमध्ये सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तसेच घरगुती गणेशोत्सव मंडळांना भेटी देत बाप्पांचे दर्शन घेतले. त्यांच्या या गाव भेट व दर्शन दौऱ्याला नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिकांनी यंदा शहरात चेहरा नवा देवा भाऊच हवा ! अशा घोषणा देत देविदास कडू यांना आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करून टाकले आहे. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी ही देविदास कडू यांची लोकप्रियता लोणावळा शहरांमध्ये चौफेर वाढत असल्याचे द्योतक आहे.

गणेश उत्सवाच्या निमित्त लोणावळा शहरातील नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असलेले भाजपाचे गटनेते व आमदार सुनील शेळके यांचे जवळचे स्नेही असलेल्या देविदास कडू यांनी लोणावळा शहरात प्रभागवार गणपती बाप्पांचे घरोघरी जाऊन दर्शन घेतले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या व प्रश्न सोडवण्याचा शब्द देखील त्यांनी दिला आहे. देविदास कडू हे लोणावळा शहरांमधील सर्वसमावेशक असे नेतृत्व म्हणून सर्वश्रुत आहे. “प्रत्येकाच्या मदतीला धावणारा देवा भाऊ” अशी त्यांची या लोणावळा शहरांमध्ये एक प्रतिमा आहे. अतिशय मृदू व गोड स्वभाव, प्रत्येकाच्या अडीनडीला मदतीला धावणारा, त्यांच्या पाठीशी उभा राहणारा देवा भाऊ हाच येणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य लोणावळाकर नागरिकांचा चेहरा असणार आहे. अगदी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत प्रत्येक जण त्यांना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत. दिवसेंदिवस त्यांची लोणावळा शहरांमध्ये लोकप्रियता ही वाढत चालली आहे. लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व येथील नागरिकांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल असा शब्द त्यांनी या गणेशोत्सवाच्या निमित्त लोणावळकर नागरिकांना दिला आहे.

त्याच्या या दर्शन दौऱ्यात त्यांच्या समवेत भाजपा माजी शहराध्यक्ष दादा धुमाळ, बाबा शेट्टी, राजेंद्र चौहान, अरुण लाड, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, मंदाताई सोनवणे, भाजपा उपाध्यक्ष सुधीर पारिठे, अविनाश पवार, अनिश गणात्रा, अश्विनीताई जगदाळे, सरपंच सनी कडू, सुषमा कडू, मेघा पांढरे, मयुरी कडू, रेश्मा परब, सुनील इंगूळकर, श्रवण चिकणे, विजय इंगूळकर, संदीप गायकवाड, संजय गायकवाड, शशिकांत मानकर, प्रकाश कालेकर, नितीन पागांरे, वैभव देशपांडे, दीपक कांबळे, शैलेश कचरे, हर्तिक हरिश्चंद्र, साई मानकर, तनीश पांगारे, प्रचीत सातपुते, सुनिल कचरे, बिपीन काळे, रोहीत वंजारी, जयप्रकाश परदेशी, शैलेश ठाकर, बुवा जाधव, वासकर सर, अनिल बांदल, स्वप्नील सावंत, सुशांत परब, जयेश ठाकर, मेघराज पांढरे, ओमकार भिकुले आदी सहभागी झाले होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *