Sports Day l कैवल्य विद्या निकेतन शाळेत आंतर शालेय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

लोणावळा : लोणावळा येथील कैवल्य विद्या निकेतन या शाळेत शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.या क्रीडा महोत्सवामध्ये शारीरिक योग्यता विषयास अनुसरून 14 वर्ष वयोगटाच्या आतील आणि 17 वर्ष वयोगटाच्या आतील स्पर्धकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 12 ते 13 शाळा सहभागी होऊन उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.लोणावळा रेल्वे पोलीस (आरपीएफ) चे पीएसआय सतपाल सिंग हे या क्रीडा महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री.सतपाल सिंग यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, त्यांच्या प्रज्ञापूर्ण शब्दांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी खेळ आणि शारीरिक शिक्षण चे महत्व सांगितले. तसेच शाळेचे निदेशक डॉ. एन. डी. जोशी यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्य सौ. भारती कावडे यांनी मनोगत व्यक्त करताना खेळाडूंचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी SMC आणि EPTA चे सदस्य ही उपस्थित होते.पारितोषिक वितरण समारंभात सर्व विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना (वैयक्तिक पातळीवरील खेळाडूंना) पदके देण्यात आले. त्याच प्रमाणे विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख रक्कम प्रदान करण्यात आली. एकूणच सर्वांसाठी हा दिवस रोमांचक ठरला.या स्पर्धेमधील विजेत्या संघांची नावे पुढीलप्रमाणे -रस्सी खेच – 1) के. व्ही.एन. (मुले), 2) के. व्ही. एन (मुली)कब्बड्डी – 1) रायवुड इंटरनॅशनल स्कूल (मुली)(प्रथम क्रमांक), 2) डी.सी. स्कूल (मुले) (प्रथम क्रमांक)रिले – 14 वर्ष वयोगटातील आतील (मुले /मुली) – 1) रायवूड इंटरनॅशनल स्कूल, 2) परिज्ञाश्रम स्कूल17 वर्ष वयोगटा आतील (मुले/मुली)- 1) लिली इंग्लिश मिडीयम स्कूल, 2) कैवल्य विद्या निकेतनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिलकीश धामणेकर आणि आभार प्रदर्शन निकिता बुद्धिसागर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.