खंडाळा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोणावळा : शिवजयंती उत्सव मंडळ, खंडाळा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षी वडू गावातून शिवज्योत प्रज्वलित करून खंडाळा येथे आणण्यात आली. लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवज्योत खंडाळा गावात आणण्यात आली.

खंडाळा गावात या शिवज्योतीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि रोषणाईने सजलेल्या वातावरणात शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या.

शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचा भरगच्च कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा (क्रमांक 10) आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने वकृत्व, रांगोळी आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच 16 मार्च रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत रांगोळी आणि किल्ले स्पर्धा घेण्यात आल्या.

17 मार्च रोजी वडू (तुळापूर), हवेली येथून आणलेल्या शिवज्योतीचे लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवज्योत खंडाळा येथे पोहोचताच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी सात वाजता शिवप्रतिमेच्या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ पोलीस निरीक्षक सुहास जगताप (लोणावळा शहर), पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ (लोणावळा ग्रामीण) आणि पोलीस सहाय्यक निरीक्षक राहुल लाड यांच्या हस्ते करण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा

या सोहळ्यास दीपक मसुरकर, मच्छिंद्र खराडे, भालचंद्र खराडे, शुभम बनसोडे, संजय कदम, राजेंद्र सपकाळ, सचिन वाळके, प्रसाद शिर्के, हरीश देवरा, वसंत कदम, प्रकाश पवार, तारामती शिर्के, बाबू पवार, संतोष गोणते, किशोर वाघमारे, चिरा खराडे, राजेश महाडिक, नितीन सोनवणे, दिनेश खराडे, संतोष वाळके, गणेश सपकाळ, ओंकार खराडे, निशान शिरसागर, भावेश खराडे, रोहित पांढरे, रोहित गुरव, गणेश पांढरे, प्रती खराडे, ऋषभ ओसवाल, चैतन्य खराडे, कार्तिक घाडगे, तेजस खराडे, मयूर पवार, सिद्धांत तावरे, ओमकार दळवी, सतीश गोनते, विजय चौरे, रघु सपकाळ, आकाश बाळकुदरी, आदित्य सपकाळ, विघ्नेश सपकाळ, मयंक खराडे, पंकज पवार, भूषण सावंत, पार्थ महाडिक, ओम डोंबले, दर्शील खराडे, यश सोनवणे, आकाश पवार, अक्षय पवार, सौरभ शिंदे, आदित्य पताडे, आकाश सोनवणे, साई सपकाळ, सुमित राव, सोहम महाडिक, आदिराज महाडिक, यश कदम, स्मित पालवे, रोहित चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक जीवन गायकवाड, समाजसेवक दत्ता दळवी, नरेंद्र कचरे, माजी नगरसेविका पूजाताई गायकवाड, राजेंद्र सरोदे, इंदुरीकर जैन पंचायतचे सागर जैन, स्वतमल जैन, सनी जैन, डॉ. चंपक जैन, पंकज काळे, विनोद ओसवाल, उद्योगपती सनी दळवी, सनी कचरे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

संस्कृती व परंपरेचा अनोखा संगम

मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, मुंबई बँजो बँड, डीजे, हलगी यांसह रोषणाईचा सुरेख संगम पाहायला मिळाला. 18 मार्च रोजी महिलांसाठी हळदीकुंकू, मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि शिवजयंती उत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ऐतिहासिक “छावा” चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले.

संपूर्ण खंडाळा गावाने मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. या सोहळ्याने गावातील शिवप्रेमींच्या मनात नवा उत्साह निर्माण केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *