सार्वजनिक नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुषमा देविदास कडू यांची निवड

लोणावळा : भांगरवाडी येथील सार्वजनिक नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुषमा देविदास कडू यांची निवड करण्यात आली आहे. सुषमा कडू ह्या नेतृत्व महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

यंदाच्या नवरात्र उत्सवाचे नियोजन उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये सुषमा देविदास कडू (अध्यक्ष), सीमा शिंदे (उपाध्यक्ष), ज्योती मोरे (खजिनदार), चेतना अनसुरकर (सहखजिनदार), वर्षा भांगरे (चिटणीस) आणि रेश्मा परब (सहचिटणीस) अशी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात उत्सवाच्या व्यवस्थापनात सहभागाची संधी मिळणार असून, सामाजिक ऐक्य आणि परंपरेच्या जोपासनेत मंडळाची भूमिका अधिक बळकट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *