Lonavala l तरुणांना विकासाच्या वाटा दाखविण्याचे राजकारण करा – कामगार नेते विजय पाळेकर यांचे आवाहन

लोणावळा : “निवडणुकीदरम्यान पैसा-दारूच्या पार्ट्या करून आपण समाजाला काय देतो आहोत? राजकारण करायचे असेल तर ते विकासाचे करा. तरुणांना रोजगाराच्या वाटा दाखवा, त्यांना व्यसनापासून दूर ठेवा. महिलांना स्वावलंबी आणि सबळ बनविणाऱ्या उपक्रमांवर भर द्या. निवडणुका झाल्यावर गायब न होता कायम नागरिकांच्या सोबत रहा,” असे अर्थपूर्ण आणि थेट आवाहन कामगार नेते विजयराव पाळेकर यांनी केले.

नांगरगाव प्रभागात आणि लोणावळा शहरात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले, नागरिकांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारे तरुण नेतृत्व सुभाष सुमंत डेनकर आणि ब्रिंदा अनिश गणात्रा, तसेच विकासदृष्ट्या सक्षम असे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे यांना कमळ चिन्हावर मतदान करून निवडून देण्याचे आवाहन पाळेकर यांनी नागरिकांना केले.

भव्य प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांगरगाव प्रभागात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे, तर नगरसेवक पदाचे उमेदवार सुभाष सुमंत डेनकर आणि ब्रिंदा अनिश गणात्रा यांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले.

मागील अनेक वर्षांपासून हे तिन्ही उमेदवार नागरिकांच्या अडीअडचणीत धावून जात असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आहे. समाजसेवा, संपर्क आणि विकासकामांतील सातत्यामुळे या उमेदवारांवर नागरिकांचा दृढ विश्वास असल्याचे पाळेकर म्हणाले. नांगरगाव प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नागरिकांनी विकासाला मत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *