जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून लोणावळा व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य यशस्वी भव या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
लोणावळा : जय हिंद लोक चळवळ लोणावळा यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य यशस्वी भव या करियर गायडन्स व एक्झाम मोटिवेशन या मार्गदर्शन शिबिराची आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 27 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 2 व दुपारी तीन ते पाच या दोन सत्रामध्ये महिला मंडळ सभागृह हुडको कॉलनी लोणावळा या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच दहावी व बारावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर पुढे काय करिअर निवडताना कोणत्या बाबींचा विचार केला जावा, कोणकोणते पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत व भविष्यामध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत, या सर्व गोष्टींची माहिती या शिबिरामध्ये दिली जाणार आहे. तसेच शिबिरामध्ये एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा, त्यांचे महत्त्व व त्यासाठी कशा पद्धतीने तयारी करावी याबाबत देखील माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. पुढील शिक्षणासाठी ज्या वेगवेगळ्या सीईटी व अन्य परीक्षा दिल्या जातात त्यांची देखील माहिती या मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व पालकांना दिली जाणार आहे. जय हिंद लोक चळवळीचे प्रमुख निखिल कवीश्वर व शुभम जोशी यांनी याबाबत पत्रकार परिषद माहिती दिली.
मार्गदर्शन शिबिरामध्ये स्टेप अकॅडमीचे प्रोफेसर संदेश मुखेडकर, अश्विनी गुडसुरकर संदीप मोरे नीलम कौशल नितीन साली संजीवनी डिंबळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लोणावळा शहर व परिसरातील पालकांनी व दहावी बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी या विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन कवीश्वर व जोशी यांनी केली आहे. या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे जय हिंद लोक चळवळीचे प्रमुख असलेले व महाराष्ट्र भरातील तरुणांचे आयकॉन्स पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित दादा तांबे व मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके हे देखील शिबिराला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

