लोणावळ्यात सरजू भवानी टी 20 क्रिकेट टूर्नामेंटचा थरार; अटीतटीच्या लढतीत ‘पुणे पोलीस’ संघाने मारली बाजी
लोणावळा : सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट लोणावळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ६५ व्या कै. सरजू भवानी टी-२० क्रिकेट टूर्नामेंट २०२६ चे विजेतेपद पुणे पोलीस क्रिकेट संघाने पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पुणे पोलीस संघाने नमो युनायटेड मुंबईचा ३ गडी राखून पराभव करत चषकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील अंतिम सामन्यात नमो युनायटेड मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित षटकांत ८ गडी गमावून त्यांनी १६९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. या धावांचा पाठलाग करताना पुणे पोलीस संघाने संयमी आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत ७ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केले आणि दिमाखदार विजय मिळवला.
स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला:
मॅन ऑफ द टूर्नामेंट : आदर्श राठोड (पंढरपूर)
सर्वोत्कृष्ट फलंदाज : हर्ष टँक (३२२ धावा, नमो युनायटेड मुंबई)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : पियुष वाघ (१० विकेट, खोपोली)
सर्वोत्कृष्ट कर्णधार : अमोल पायगुडे (पुणे पोलीस)
सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक : अनिकेत पठारे (पुणे पोलीस)
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक : प्रथम (पुणे पोलीस)
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गुलाम पारकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर सलीम मोहम्मद, सागर कदम (एडीइएन लोणावळा), नगरसेवक निखिल कवीश्वर, आशिष सिंग (RPF इन्स्पेक्टर), भाऊ मांडेकर (एसएसइ), श्री. राव साहेब, सजी वर्गिस (एसएसइ), अरुण कुमार पात्रा (स्टेशन मॅनेजर), सतपाल सिंग (क्राइम ब्रांच इन्स्पेक्टर), दबडे साहेब (पोलीस इन्स्पेक्टर), आणि विशाल गुरव (अध्यक्ष, NRMU लोणावळा) आदि मान्यवर उपस्थित होते.
या हीरक महोत्सवी वर्षात महाराष्ट्रातील पुणे, रायगड, ठाणे, सोलापूर यांसह विविध जिल्ह्यांतील एकूण १६ नामांकित संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे यशस्वी आयोजन सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सचिव शेखर शेळके, खजिनदार रोहित गायकवाड, भूषण सुर्वे, आणि कमिटी मेंबर्स राहुल मोरे, राहुल साबळे, अक्षय गव्हाणे, साईनाथ गायकवाड, मयूर बोरकर व विशाल कदम यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पाडाळे (वर्किंग सचिव, NRMU) यांनी केले. पंच म्हणून प्रफुल्ल बारी, अरुण शेंडे, नामाजि कृष्ण, अभिजित कदम यांनी काम पाहिले, तर स्कोरर म्हणून यश कांबळे आणि विश्वास बनसोडे यांनी जबाबदारी सांभाळली. मैदानाची देखभाल वॅलेंटीन डिसुझा, चंदन झटके, सागर ठुले, शत्रुघन भालेसाईन, किरण ओव्हाळ, सचिन मराठे आणि रघुनाथ पिंपळे या कर्मचाऱ्यांनी केली.

