नांगरगाव प्रभागात स्थानिक भूमिपुत्र सुभाष डेनकरांच्या विजयासाठी मतदार एकवटले; जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढत रंगात
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या नांगरगाव प्रभाग क्रमांक पाचमधील सर्वसाधारण जागेसाठी येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होत असून, या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्र सुभाष सुमंत डेनकर यांच्या विजयासाठी संपूर्ण प्रभाग एकवटल्याचे चित्र दिसून येत आहे. नांगरगाव प्रभागातील स्वाभिमानी मतदार सुभाष डेनकर यांच्या विजयाचा अध्याय लिहिण्यास सज्ज झाले आहेत.
सुभाष सुमंत डेनकर हे गेल्या अनेक वर्षांपासून नांगरगाव प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांचे वडील सुमंत डेनकर यांनीही या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने त्यांचा व्यापक जनसंपर्क व नातेवाईक परिवार या भागात आहे. सुभाष डेनकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता नागरिकांना मूलभूत व उत्तम सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, नांगरगाव प्रभागाला लोणावळा शहरातील आदर्श प्रभाग म्हणून ओळख मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
या प्रभागात सुभाष डेनकर यांनी केलेली विकासकामे नागरिकांच्या आजही स्मरणात असून, पुढील काळात करावयाच्या कामांचा सविस्तर आराखडाही त्यांच्या हातात तयार आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणे, नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि कायम त्यांच्या पाठीशी उभे राहणे या स्वभावगुणांमुळे मतदार मोठ्या विश्वासाने त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत.
नांगरगाव प्रभागातील ही निवडणूक स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे अशी होत असल्याने, स्थानिक उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदारांमध्ये एकजूट दिसून येत आहे. शिवसेना पक्षानेही सुभाष डेनकर यांना जाहीर पाठिंबा दिला असून, त्यांच्या विजयासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत.
ही लढत जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची असल्याचे मतदारांमधून बोलले जात असून, पैशाच्या जोरावर गावाचा स्वाभिमान विकत घेण्याची भाषा करणाऱ्यांना मतपेटीतून योग्य उत्तर दिले जाईल, असा निर्धार येथील नागरिक व्यक्त करत आहेत. गाव भाग आणि सोसायटी असा विभाग असला तरी नांगरगावचा मतदार कोणत्याही आमिषाला बळी पडणारा नसून स्वाभिमानी आहे, असे स्पष्ट मत व्यक्त होत आहे.
स्थानिक भूमिपुत्र सुभाष डेनकर यांच्या पाठीशी केवळ नांगरगावच नव्हे तर संपूर्ण लोणावळा शहर व ग्रामीण भाग खंबीरपणे उभा असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे गाव विकत घेणाऱ्यांना नाही, तर गावाच्या विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या हक्काच्या स्थानिक भूमिपुत्रालाच मतदारांनी पाठिंबा द्यावा, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.

